तू पावसासारखी वाटतेस...


पावसासारखाचं तूही नक्षत्रांचे देणे,
मनात येईल तूझ्या तेव्हाच तुझं येणे,
सैरभैर वाऱ्यातही रिमझिमपणे बरसणं,
अन वर्षाव करताना प्रेमाचा कधी अचानक गरजणं...
खरंच, तू मला पावसासारखी वाटतेस...

कधी सरीवर सरी अन कधी खूप वेळ दडी,
तूझ्या येण्यानं जीवनाला पालवी फुटलीय नवी,
दूथडी भरुन वाहेल मनात आनंदाची नदी,
पाउस पडत असतानाच भेटशील जर कधी...
खरंच, तू मला पावसासारखी वाटतेस...

चिंब भिजून तुझ्यात मी दरवळतो मृदगंधासारखा,
वाट पाहण्यात तुझी तळमळतो चातकासारखा,
क्षणभर भेटीतही तुला साठवतो मडक्यासारखा,
चाहूल लागताच तूझी मी नाचतो मोरासारखा,
खरंच, तू मला पावसासारखी वाटतेस...


आता फ़क्त इतकीच इच्छा आहे की,
रणरणत्या उन्हात तू स्वताःला माझ्यावर शिंपडावं,
वादळाच्या रात्री येऊन आवेगाने बिलगावं,
कैद होउन शिंपल्यात माझ्यासाठी तू मोत्यासारखं चमकावं,
अन आयुष्याच्या प्रत्येक पानावर दवासारखं साचावं,
कारण खरंच, तू मला पावसासारखी वाटतेस...


- स्वप्नील संजयकुमार कोटेचा

Comments