जखमा भरतातच सगळ्या...


कधी जखमा ओल्या असतात, तर कधी पापण्यांच्या कडा, आसवांचे झरे आटले तरी बरसत राहतात धारा,
दिवस सरतात सारे, ऋतूही बदलत राहतात,
तिच्या नसण्याची खंत मात्र तशीच कायम राहते,
कारण जखमा भरतातच सगळ्या,
पण व्रण मात्र तसेच राहतात... 


वारा तिच्या केसांशी आजही मनसोक्त खेळत असतो,
मी मात्र तिची एक झलक पाहण्यासाठी वेड्यासारखं आतुर असतो, विसरतो मी स्वतालाही कधी कधी
पण तिच्यासोबतचे क्षण सगळे आठवणीत राहतात...
कारण जखमा भरतातच सगळ्या,
पण व्रण मात्र तसेच राहतात...

पुरं होण्यापेक्षा स्वप्नांनाही तुटायलाच जास्त आवडत असावं, नाहीतर चंद्राला चकोर बनण्यात काय सुख मिळत असावं, मावळते रात्र तरी तिच्यात उद्याची एक आस असते, ती सोबत नसली तरी प्रत्येक क्षणी तिचा भास असतो,
कारण जखमा भरतातच सगळ्या,
पण व्रण मात्र तसेच राहतात...
- स्वप्निल संजयकुमार कोटेचा

Comments

Popular Posts