हे माहित असतानाही...



खळखळत्या हास्याचं तिच्या अप्रूप फार वाटतं,
रमुन गेलो त्यात की वेळेचं भानच नसतं,
लाजणं, बोलणं, बागडणं तिचं मला फार आवडतं,
हे सारं माझ्यासाठी नाही, हे माहित असतानाही...

सुरूवात होते दिवसांची तिच्याच सोनेरी स्वप्नांनी,
देखण्या टपोऱ्या डोळ्यांत तिच्या सायंकाळ मावळते,
अजूनही मन दाटून येते तिच्या आठवणीनी,
विसरुन जाईल ती मला कधीतरी, हे माहित असतानाही... 

सागराच्या मीलनासाठी बेभान धावणाऱ्या नदीप्रमाणे,
वाटतं धावत येईल तीही कधीतरी,
आस लावून बसलो आहे वाटेवरती,
येणार नाही कधीच ती, हे माहित असतानाही... 

जीवनाच्या वाटेवरती तसे चालता येतं एकटंही,
पण सोबत ती असण्याची मजाच काही और होती,
हातच धरला नाही तीने कधी माझा,
तिच्याशिवाय मी जगू शकत नाही, हे माहित असतानाही... 

धावत राहिलो मी या मृगजळामागे वेडयासारखा,
सर्वांच्या नशिबी प्रेम नसतं, हे माहित असतानाही... 


- स्वप्निल संजयकुमार कोटेचा

Comments

Post a Comment

Popular Posts