आजच्या समाजाची अवस्था

आजच्या समाजाची अवस्था श्रीकृष्णासारखी आहे... शंख फूंकून युद्ध तर पुकारावे लागतंय आणि लढताही येत नाही...

आजच्या समाजाची अवस्था  पितामह भीष्मसारखी आहे...मृत्यूशय्येवर झोपावे लागतंय आणि मरताही येत नाही...

आजच्या समाजाची अवस्था कौरव - पांडवांसारखी आहे... सत्तेसाठी भांडत  आहेत ते ज्यांना स्वतःचंच घर सांभाळता येत नाही...

आजच्या समाजाची अवस्था गांधारीसारखी आहे... स्वतःच बांधलीय पट्टी डोळ्यांवर आणि गाठ सोडताही येत नाही...

आजच्या समाजाची अवस्था  युधिष्ठिरासारखी आहे... सर्वस्व लावलंय डावावर आणि डाव अर्ध्यावर सोडताही येत नाही...

आजच्या समाजाची अवस्था वीर अर्जुनासारखी आहे... हाती गांडीव अन समोर शत्रू तर आहे पण तीर सोडताही  येत नाही...

आजच्या समाजाची अवस्था बिचाऱ्या कर्णासारखी आहे... बरोबर असूनही चुकीच्या बाजूला आहे पण माघारही घेता येत नाही...

आजच्या समाजाची अवस्था अभिमन्यूसारखी आहे... चक्रव्यूह तर भेदलंय त्याने  पण बाहेर पडताही येत नाही...

आजच्या समाजाची अवस्था कुरुक्षेत्रासारखी आहे... सत्याच्या बाजूने हाताच्या बोटांइतके आणि असत्याच्या बाजूने इतके की गणितात मोजताही येत नाही...

- स्वप्निल संजयकुमार कोटेचा

Comments

Popular Posts