माझ्यातला 'मी' हरवलाय...

माझ्यातला 'मी' हरवलाय...

ऑफिसच्या फायलींमध्ये अन न संपणाऱ्या टार्गेटसमध्ये... अपेक्षांच्या ओझ्याखाली...
अन स्वप्नांच्या मायाजालामध्ये...

गजबजलेल्या रस्त्यांवरती अन दिवसभराच्या धावपळीमध्ये...
24 तासांच्या तबकड़ीमध्ये...
अन भिंतीवरच्या कैलेंडरमध्ये...

इथेच होता मघाशी पण आता सापडत नाहीये...  पुन्हा सापडण्याची आशा नाही म्हणून मीही त्याला शोधत नाहीये...

माझ्या आनंदात हसायचा तो...  माझ्या दुःखावर फुंकर मारायचा...  लहानपणापासून सोबत दिली त्याने आणि आता अचानक साथ सोडून केला लोचा...

शोधला तर सापडेल कदाचित पण माझ्याकडे वेळ आहे??
जाऊ दे... झोपतो आता... उदया पुन्हा ऑफिसला जायचे आहे...

- स्वप्निल संजयकुमार कोटेचा

Comments

Popular Posts