जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत... जगण्यासाठीच वेळ नाहीये...

जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत... जगण्यासाठीच वेळ नाहीये...
वरवर हिशेब लागतात सारे,
पण कशाचाच कशाला मेळ नाहिये...
स्वप्नं आहेत माझीच सारी,
पण ओढ़ाताण जरा जास्त होतीये...
खर्च झालोय अर्धा-निम्मा तरी
स्वप्नांची किंमत पूर्ण होत नाहीये...
AC मध्ये रोज बसतो मी,
मला वाऱ्याची मंद झुळुक अनुभवायची आहे...
BISLERI चं पाणी नको,
मला एखाद्या झऱ्याखाली ओंजळ भरायची आहे...
दिवसभर PHONE चालू असतोच माझा, मला कुणाशीतरी मनातलं बोलायचं आहे...
प्रवास... माझा नेहमीचाच आहे,
कधीतरी वेड्यासारखं मला मनसोक्त भटकायचं आहे...
दिवस रोजच मावळतो, रात्र रोजच होते,
कधीतरी मलाही लवकर घरी जायचे आहे...
चंद्रासारखा मीही रात्रभर जागाच असतो,
मला एखाद्या रात्री शांत निवांत झोपायचं आहे...
रविवारची सुट्टीसुद्धा आता मागून घ्यावी लागते...
मला नसली तरी चालेल शरीराला थोड़ी विश्रांती घ्यायची आहे...
पाऊस आवडतो मला पण कागद आणि लॅपटॉप सांभाळायचे असतात,
कधीतरी सारं विसरून मला चिंब भिजायचं आहे...
पगारासोबत Office ची वेळ पण वाढत चाललीये...
पैसे कमी राहिले तरी चालतील पण मला थोडंसं शिल्लक राहायचं आहे...
रोज किती नव्या लोकांना भेटतो मी,
तरीही चौकातल्या कट्टयावर जुन्या मित्रांना भेटायचं आहे...
जगण्याच्या बुद्धिबळात केव्हाच Checkmate  झालोय मी,
आता गल्लीतल्या बारक्यांसोबत 'एका टप्प्याचं Cricket खेळायचं आहे...
Pizza-Burger अन् वडापावलासुद्धा वैतागलोय मी,
मला दगड़ं मारून पाडलेल्या चिंचा खायच्या आहेत...
जगण्याची व्याख्या माझी निराळीच होती, जगाची रीत मात्र आगळीच आहे...
कष्ट करावे लागतात म्हणून मी दुःखी नाहीये, पण मला फ़क्त दुनियादारीसाठी जगायचं नाहीये...
उद्याची खात्री इथं कोणालाच नाहीये,
म्हणूनच मला 'आज'साठी जगायचं आहे...
कारण जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत...  जगण्यासाठीच वेळ नाहीये...
- स्वप्नील संजयकुमार कोटेचा

Comments

Popular Posts